महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईसाठी लसीचे 99 हजार डोस प्राप्त; लसीकरणाला सुरुवात - मुंबई कोरोना लसीकरण लेटेस्ट अपडेट बातमी

लसी अभावी मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले होते. शुक्रवारी पुण्याहून मुंबईला लसीचे ९९ हजार डोस पाठवण्यात आले. त्यामुळे लसीकरण पुन्हा सुरू झाले.

Mumbai Corona Vaccination
मुंबई कोरोना लसीकरण

By

Published : Apr 10, 2021, 1:17 PM IST

मुंबई - काल रात्री पुण्याहून लसीचे केवळ ९९ हजार डोस प्राप्त झाले आहेत. मुंबईतील लसीकरण ठप्प झाल्यानंतरही पुढचे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पुरवठा झाला आहे. आज(शनिवार) दुपारी १२ वाजता महानगरपालिकेच्या केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईतील महानगरपालिका लसीकरण केंद्रांपर्यंत कोल्ड चेनद्वारे लस पोहोचवण्यात आली.

मुंबईच्या पालकमंत्र्यांचा केंद्रावर आरोप -

मुंबईतही लसीचा तुटवडा असल्याने बीकेसी, भाईंदर, मुलुंड येथील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे, अशी खंत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी व्यक्त केली होती. देशातील एकूण रूग्ण संख्येपैकी 62 टक्के रूग्ण महाराष्ट्रात असताना देखील केंद्राकडून महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा लसीचा साठा कमी मिळत असल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

केंद्राची मदत अपेक्षेप्रमाणे नाही - आरोग्य मंत्री

केंद्र सरकार मदत करत आहे मात्र, ती अपेक्षेप्रमाणे नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता, गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? याचा विचार करायला हवा. गुजरातला 1 कोटी लसी दिल्या व महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. आम्हाला एका आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. ते याची दखल घेतील, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details