मुंबई- लसीकरण मोहिमेदरम्यान मंगळवारी 26 हजार 15 जणांना कोरोना लस देण्यात आली. तसेच आतापर्यंत एकूण 27 लाख 57 हजार 489 जणांना लस देण्यात आली आहे. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला, तरच लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशी आहे लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 26 हजार 015 हजार जणांना लस देण्यात आली. त्यात 12 हजार 754 जणांना पहिला, तर 13 हजार 261 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 27 लाख 57 हजार 488 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 20 लाख 80 हजार 379 लाभार्थ्यांना पहिला, तर 6 लाख 77 हजार 110 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 96 हजार 548 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 52 हजार 457 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 4 हजार 83 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 69 हजार 644 तर 18 ते 44 वर्षामधील 34 हजार 857 जणांना लस देण्यात आली.