महाराष्ट्र

maharashtra

राज्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना आजपासून लसीकरण

By

Published : Apr 1, 2021, 12:47 PM IST

आता 45 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून (दि. 1 एप्रिल) या लसीकरणाच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 26 लाख 77 हजार कोविशिल्ड लसीचे डोस केंद्राने राज्य सरकारला दिल्याचे समजते.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - राज्यात कोरोनाच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. आता 45 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून (दि. 1 एप्रिल) या लसीकरणाच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 26 लाख 77 हजार कोविशिल्ड लसीचे डोस केंद्राने राज्य सरकारला दिल्याचे समजते.

दरदिवशी 3 लाख लस

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढते संक्रमण चिंतेची बाब ठरत आहे. संक्रमण वाढत असले तरी लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आले आहे. येत्या दोन-तीन महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना डोस देण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्यात या लसीकरण टप्प्यात 3 कोटी 86 लाख 29 हजार 783 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील 39 लाख 2 हजार 233 नागरिकांचा, पुण्यातील 35 लाख 24 हजार 591 आणि ठाण्यातील 42 लाख 43 हजार 776 नागरिकांचा समावेश आहे. दर दिवशी 3 लाख दिल्या पाहिजेत या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

चोख आरोग्य व्यवस्था

राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. ही बाब लक्षात घेत, राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व उन्हापासून संरक्षण होईल, अशी चोख व्यवस्था उभारल्याचे डॉ. व्यास म्हणाले.

हेही वाचा -मुंबईत आजपासून दोन सत्रात होणार लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details