मुंबई- राज्यात गुरूवारी 48 हजार 006 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. आजपर्यंत 8 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी 972 जणांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली, तर इतरांना कोव्हीशिल्ड ही लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात गुरूवारी 841 केंद्रांवर 48 हजार 006 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 40,931 लाभार्थ्यांना पहिला, तर 7075 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 14 हजार 673 आरोग्य आणि 26 हजार 258 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 7075 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 47,034 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 40,103 लाभार्थ्यांना पहिला व 6931 लाभार्थ्याना दुसरा डोस देण्यात आला. 972 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. 434 त्यापैकी 828 लाभार्थ्यांना पहिला, तर 144 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत 8 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.