मुंबई -कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 53 हजार 712 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 11 लाख 40 हजार 820 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात आज 806 केंद्रांवर 53 हजार 712 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 28,280 लाभार्थ्यांना पहिला तर 25,432 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 7 हजार 693 आरोग्य आणि 20 हजार 587 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 25 हजार 432 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 52 हजार 671 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 1041 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 11 लाख 40 हजार 820 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.