मुंबई - 1 मे पासून देशभरात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत 5 लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील 2 हजार 531 लाभार्थ्यांना काल लस देण्यात आली. ज्यांना कोविन अॅपवरून मेसेज आला त्यांनाच 5 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात आली. आजही या वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 56 हजार 672 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा -घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये 20 वर्षीय तरूणाची जुन्या वादातून 7 जणांकडून हत्या
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल 2 हजार 531 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 2 हजार 468 लाभार्थ्यांना पहिला, तर 63 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 56 हजार 672 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 लाख 65 हजार 622 लाभार्थ्यांना पहिला, तर 4 लाख 91 हजार 50 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 723 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 27 हजार 209 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 80 हजार 136 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 62 हजार 185, तर 18 ते 44 वर्षांमधील 3 हजार 419 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू