मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज मंगळवारी 48 हजार 387 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत (१ जून)ला 48 हजार 387 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 45 हजार 746 लाभार्थ्यांना पहिला, तर 2 हजार 641 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 33 लाख 24 हजार 428 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामध्ये 25 लाख 71 हजार 678 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 52 हजार 750 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 4 हजार 24, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 61 हजार 937, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 23 हजार 972, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 11 लाख 60 हजार 862 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 2 लाख 70 हजार 482, 1 हजार 276 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 1875 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहीम