महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र' - लसीकरण केंद्र

महाराष्ट्र सरकार मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र उभारण्याचे काम करत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी सरकारने निविदा मागवल्या आहेत.

'मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र'
'मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र'

By

Published : May 24, 2021, 6:03 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र उभारण्याचे काम करत आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने निविदा मागवल्या आहेत. यामध्ये काही निविदा अंतिम झाल्या आहेत.

'मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र'

केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारनेही १२ कोटी लस खरेदीची योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २ मध्ये मराठी पाठशाळेमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन मुंबईचे माजी नगराध्यक्ष सुहास वाडकर यांच्या हस्ते झाले. या दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक शंकर हुंदारे म्हणाले, लसीकरण केंद्रात दररोज १०० लोकांना लस देण्यात येईल, ज्यामध्ये ४५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. लसीचा साठा लक्षात घेता ही संख्या हळूहळू वाढविली जाईल असेही हुंदारे म्हणाले.

हेही वाचा -मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details