मुंबई -मुंबईत कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत 23 हजारहून अधिक कोरोना योद्ध्यांना लस टोचण्यात आली आहे. तर, आता लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. कारण, आता सेव्हन हिल्स रुग्णालयात 15 युनिट्सचे लसीकरण केंद्र कालपासून सुरू करण्यात आले असून, पहिल्या दिवशी 300 हून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. तर, आता उद्यापासून गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्येही दोन युनिट्स सुरू होणार आहेत.
15 ही युनिट्समध्ये लसीकरण
आतापर्यंत मुंबईत 9 लसीकरण केंद्र असून यात 72 युनिट्स आहेत. तर, कालपासून यात सेव्हन हिल्समधील 15 युनिट्सची भर पडली. मुंबई महानगर पालिकेच्या निर्देशानुसार या रुग्णालयात 15 युनिट्स तयार करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्या हस्ते काल (बुधवारी) या केंद्राचे उद्घाटन झाले.
हेही वाचा -उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'ड्रायव्हरलेस मेट्रो'चे अनावरण