मुंबई : उत्तराखंडचे आरोग्यमंत्री धनसिंग रावत ( Uttarakhand Health Minister Dhan Singh Rawat ) यांनी आज ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे समूह रुग्णालय ( J J Group Hospital ) आणि ओ. पी. डी. च्या दैनंदिन कामकाजाची पाहणी करण्याकरिता सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी रुग्णालयाच्या अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.
DhanSingh Rawat : उत्तराखंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली जे जे रुग्णालयाला भेट - Uttarakhand Health Ministe
उत्तराखंडचे आरोग्यमंत्री धनसिंग रावत ( Uttarakhand Health Minister DhanSingh Rawat ) यांनी आज ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे समूह रुग्णालय आणि ओ. पी. डी. च्या दैनंदिन कामकाजाची पाहणी करण्याकरिता सदिच्छा भेट दिली.
उत्तराखंडच्या आरोग्य मंत्र्यांची भेट :ग्रां.शा.वै.म. आणि सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इतिहासासंबंधी माहिती दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या चमुने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित प्रजापती, अधिसेविका बेलदार, म.सु.ब. अधिकारी पालकर, स्वच्छता निरीक्षक जाधव यांनी रावत यांना रुग्णालयातील ऑर्थो ओपीडी, सर्जरी ओपीडी, क्षयरोगचिकीत्सा विभाग ओपीडी, मेडीसीन ओपीडी, स्त्रीरोगचिकीत्सा विभाग ओपीडी, गुप्तरोग विभाग ओपीडी, रेडीओलॉजी विभागातील एमआरआय सीटी स्कॅन मशिन, आपातकालीन विभाग, मेन ओटी, कॅथलॅब, आयसीसीयू आदी विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजासंबंधी माहिती दिली. सदर विभागांमध्ये भेटी देत असतांना रावत यांनी तेथे असलेल्या डाक्टर्स, स्टाफ नर्सेस, कर्मचारी वृंद आदी करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबद्दल प्रशंसा केली. रावत यांनी रुग्णांची देखिल विचारपूस केली व रुग्ण घेत असलेल्या उपचारासंबंधी माहिती घेतली.