महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर' - 'Chief Electoral Officer Maharashtra'

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी 'Chief Electoral Officer Maharashtra' या नावाने पेज सुरू केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या.

use-of-bjps-social-media-company-by-maharashtra-election-commission-prithviraj-chavan
'महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर'

By

Published : Jul 24, 2020, 5:10 PM IST

Updated : Jul 24, 2020, 5:22 PM IST

मुंबई-2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाचे फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे. परंतु, हा प्रकार लोकशाही मधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवणारा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला आहे.

'महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर'

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी 'Chief Electoral Officer Maharashtra' या नावाने पेज सुरू केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. हे पेज तयार करताना वापरकर्त्याने "२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई" हा पत्ता दिला होता.

हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता पुढील गोष्टी प्रकाशात आल्या. फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम 'साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. हा पत्ता या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (BJYM) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाईटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार, त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदी’ इत्यादी पेजेसची फाऊंडर असल्याचे समोर येते.

ही पेजेस भाजपचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केले असल्याचे त्याच्या वेबसाईटवरून समोर येते. घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु, या घटनेवरुन असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. त्यामुळे या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सांगितले आहे.

Last Updated : Jul 24, 2020, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details