मुंबई- येथील आजाद मैदानावर 2 फेब्रुवारी रोजी शरजिल इमाम याच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली होती. या आरोपाखाली उर्वशी चुडावाला विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चुडावाला हिला अटक केल्यास 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर पोलिसांनी तिची सुटका करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
यापूर्वी चुडावालाने सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तिची याचिका फेटाळण्यात आली होती. 12 फेब्रुवारी व 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान आजाद मैदान पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.