महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना विधानसभा संघटकाच्या आंबा महोत्सवाला उर्मिलाची हजेरी - Mumbai

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व चारकोप विधानसभेचे शिवसेना संघटक संतोष राणे यांनी भरवलेल्या या महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या उमेदवार व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भेट दिली.

शिवसेना विधानसभा संघटकाच्या आंबा महोत्सवाला उर्मिलाची हजेरी

By

Published : May 5, 2019, 9:53 PM IST

मुंबई- बोरीवलीतील मालपानी ग्राऊंडवर पहिल्यांदाच आम्रोत्सव-२०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. व्हिनसम फ्रोलीक व अन्सायलो एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व चारकोप विधानसभेचे शिवसेना संघटक संतोष राणे यांनी भरवलेल्या या महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या उमेदवार व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भेट दिली.

शिवसेना विधानसभा संघटकाच्या आंबा महोत्सवाला उर्मिलाची हजेरी

आंबा व काजूगर, असे कोकणाचे समीकरण आहे. या महोत्सवाला भेट देऊन आंनद झाला, तसेच हा महोत्सव अधिक मोठा व्हावा, अशी प्रतिक्रिया यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी दिली.

शिवसेनेच्या संघटकाने हा महोत्सव आयोजित केला असून याबाबत उर्मिलाला विचारले असता, आंब्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव नसते, आंब्याच्या प्रेमापोटी व येथील नागरिकांसाठी या ठिकाणी आल्याचे उर्मिलाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details