महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उर्मिला मातोंडकर, एकनाथ खडसे, राजू शेट्टी आणि यशपाल भिंगे यांचे नाव यादीतून वगळण्याची शक्यता - Raju Shetty news

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची दिलेल्या यादीमध्ये आता एक नवीन समस्या उभी राहिली आहे. नजीकच्या काळात निवडणूक लढवलेल्या सदस्याला राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषित करता येते का, याबाबत तांत्रिक बाजू राज्य सरकारकडून तपासल्या जात आहेत.

c
c

By

Published : Sep 4, 2021, 3:34 PM IST

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव पास करून राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, या यादीमध्ये असलेल्या बारा नावांपैकी उर्मिला मातोंडकर, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्याची शक्यता शक्यता वर्तवली जात आहे.

बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची दिलेल्या यादीमध्ये आता एक नवीन समस्या उभी राहिली आहे. नजीकच्या काळात निवडणूक लढवलेल्या सदस्याला राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषित करता येते का, याबाबत तांत्रिक बाजू राज्य सरकारकडून तपासल्या जात आहेत. बुधवारी (1 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या मुद्द्याबाबत राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर नजीकच्या काळात निवडणूक लढविलेल्या सदस्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करता येते का, याबाबत आता चाचपणी सुरू झाली आहे. निवडणूक लढवण्याचा तांत्रिक मुद्दा समोर आल्यास याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाला बसणार आहे. या तीनही पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये बदल करण्याची गरज लागणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे.

मुख्यमंत्री घेणार नावांबाबत अंतिम निर्णय

नजीकच्या काळात निवडणुकीमध्ये पराजय झालेल्या सदस्यांची नावे तात्काळ राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांसाठी देता येतात किंवा नाही, याबाबत सरकार पडताळणी करत आहे. या कारणामुळे दिलेल्या यादीमध्ये काही नावांबाबत अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून लढवली होती निवडणूक

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेतून लढवती होती निवडणूक

राजू शेट्टी यांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदासंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

यशपाल भिंगे यांनी नांदेडमधून लढवली होती निवडणूक

यशपाल भिंगे यांनी 2019 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती.

एकनाथ खडसे यांच्या मागे आहे ईडीचा ससेमिरा

एकनाथ खडसे यांच्या मागे ईडी (सक्तवसुली संचालनालय) ससेमिरा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे एकनाथ खडसे यांचेही नाव यादीतून वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -स्वपक्षातील नेत्यांकडून महिला नेत्यांचे पंख छाटले जातात; मंदा म्हात्रेंचा रोखठोक विधान

ABOUT THE AUTHOR

...view details