महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या पुढील टप्प्यांसाठी उर्मिला करणार काँग्रेसचा प्रचार - मुंबई

तसेच पुढील प्रचारासंदर्भात आपण पदाधिकारी व काँग्रेसांतर्गत बैठकाही घेणार आहोत, असे मातोंडकर म्हणाल्या.

निवडणुकीच्या पुढील टप्प्यांसाठी उर्मिला करणार काँग्रेसचा प्रचार

By

Published : May 2, 2019, 9:41 PM IST

मुंबई- काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांत काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. पुढील २० दिवसांत देशभरात राहिलेल्या टप्प्यांसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान काँग्रेसच्या प्रचारात आपण सहभागी होणार असल्याचेही मातोंडकरांनी सांगितले.

निवडणुकीच्या पुढील टप्प्यांसाठी उर्मिला करणार काँग्रेसचा प्रचार

मुंबईत २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पहिल्यांदाच उर्मिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर आल्या. निवडणुकीच्या काळात महिनाभर प्रचाराच्या रणधुमाळीत उर्मिला यांच्यासोबत काँग्रेसचे उत्तर मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उतरले होते. आज या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी उर्मिला यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम कांदिवलीत आयोजित केला होता. यावेळी उर्मिलाने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व माध्यमांचे आभार मानले.

निवडणुकीनंतर मी दोन दिवस थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेली असेल, असे काहींना वाटले असेल, मात्र मी मुंबईतच आहे. गेल्या महिनाभरात, मी कांदिवलीत राहत होते. तसेच पुढील प्रचारासंदर्भात आपण पदाधिकारी व काँग्रेसांतर्गत बैठकाही घेणार आहोत, असे मातोंडकर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details