मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जनाची धूम असणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला गाजत वाजत निरोप देण्याकरिता भाविकांची तयारी जोरात सुरू आहे. तर, मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी मुंबईच्या रस्त्यावर तब्बल 40 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहेत.
यंदा मुंबईतील 129 ठिकाणी गणपती विसर्जन होणार असून मुंबईच्या समुद्र किनारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू, तटरक्षक दल व नौदलाची मदत घेऊन बोटी व लॅचेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 53 रस्त्यांवर एकदिशा (वन वे) मार्ग करण्यात आला आहे. मुंबईतील 99 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला असून 18 ठिकाणी रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईतील गणेश गौरव पुरस्कार जाहीर; माझगांवच्या ताराबाई गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक