महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता महाविद्यालयांमध्ये ‘सत्य, अहिंसा, शांतीची शिकवण’; अनुदान आयोगाचा नवा अभ्यासक्रम - अनुदान आयोग बातमी

संवाद कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, नेतृत्त्व आणि व्यवस्थापन तसेच मानवी मूल्ये अशा चार विभागात या अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक भागाला ३० तासांचा अवधी देण्यात आला आहे. तर संपूर्ण अभ्यासक्रमाना ८ श्रेयांक निश्चित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

By

Published : Mar 20, 2021, 9:35 PM IST

मुंबई- पदवीधर विद्यार्थ्यांना सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात वावर असतो. अशावेळी अभ्यास व्यतिरीक्त विशेष कौशल्य शिकविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘जीवन कौशल्य’ नावाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाला ८ श्रेयांक देण्यात आले असून तो १२० तासांचा असाणार आहे.

कौशल्य अभ्यासक्रमाची मागणी
पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य असे विविध कौशल्यांची उणीव जावणत असते. यामुळे अनेकदा त्यांना चांगल्या नोकरीलाही मुकावे लागते. तर अनेकदा काम करताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे अनेक बड्या कंपन्या नवनियुक्त उमेदवारांना विशेष प्रशिक्षणही देतात. याबाबतही कंपन्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात घेऊन या कौशल्यांचा अभ्यासक्रमातच समावेश करावा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

३० तासांचा अवधी
आयोगोन ‘जीवन कौशल्य’ शिक्षण देताना नेमक्या काय बाबी विचारात घ्यावा. कोणते कौशल्य आणि किती प्रमाणात अवगत होणे आवश्यक आहे. याचा एक मसुदा तयार केला आहे. यानुसार याबाबतच्या अभ्यासक्रमाचा एक मसुदा आयोगाने प्रसिद्ध केला आहे. हा मसुदा जीवन कौशल्ये शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. संवाद कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, नेतृत्त्व आणि व्यवस्थापन तसेच मानवी मूल्ये अशा चार विभागात या अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक भागाला ३० तासांचा अवधी देण्यात आला आहे. तर संपूर्ण अभ्यासक्रमाना ८ श्रेयांक निश्चित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहे.

सत्य,अहिंसा,शांतीची शिकवण
या अभ्यासक्रमातील मानवी मूल्ये या विभागात सत्य, अहिंसा, शांती, त्याग, प्रेम आणि करुणा याबाबतचे शिक्षण दिले जाणार आहे. भावी पिढी आदर्श असावी, या उद्देशाने ही मानवी मूल्ये त्यांना अवगत असणे आवश्यक असल्याचा विचार या मागे असेल. असे मत शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.

हेही वाचा-आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details