पहिल्यांदाच अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत मुंबई : उर्फी जावेदला सांगितले की, तुझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या तुझ्या चाहत्यांना तू काय सांगशील? यावर उर्फी जावेद ( Bollywood actress and model Uorfi Javed ) म्हणाली की, प्रेम माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहणार आहे. यावर पापाराझी म्हणाले की, आमच्यासाठी, तुझ्यावर प्रेम करणे. यावर उर्फी जावेदने फ्लाइंग किस दिला. उर्फी जावेदच्या या वक्तव्यावर लोक कमेंट करत आहेत आणि आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर त्यांना यासाठी ट्रोल देखील केले जात आहे. ( Videos and photos are topic of discussion ) तुम्हाला सांगतो, नुकतीच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात तक्रार दाखल केली आहे. (BJP Mahila Morcha president Chitra Wagh ) त्यावर उर्फीचेही उत्तर आले आणि ते म्हणाले की हे लोक मला आत्महत्या करण्यास भाग पाडतील. इतकेच नाही तर उर्फी जावेदने ती भाजपमध्येही जाणार असल्याचे सांगितले. ( Uorfi javed takes jibe at chitra wagh )
उर्फीने केले असे ट्वीट : भाजप पक्षात प्रवेश घेण्यापुर्वी चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवतो का? भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. तुम्ही तर त्याच्या सर्व चुका विसरुन गेल्यात ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला होता. असे ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून उर्फीला असे म्हणायचे होते की संजय राठोड हे मविआचा भाग होते. तेव्हा चित्रा वाघ त्यांच्या विरोधात बोलत होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करत होत्या.
चित्रा वाघ यांनी केली उर्फीवर कारवाई करण्याची मागणी :चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (Uorfi Javed Chitra wagh controversy) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.
समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (Uorfi Javed Chitra wagh controversy) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (action on actress Uorfi javed) आहे. दरम्यान, उर्फीने केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.