महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई : वापरात नसलेल्या बसचे प्रचाररथात रुपांतर - new mumbai latest news

नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी वापरात नसलेल्या बसचे रुपांतर प्रचाररथात करण्यात आले आहे.

unused buses covert into envornment awareness chariot in new mumbai
नवी मुंबई : वापरात नसलेल्या बसचे प्रचाररथात रुपांतर

By

Published : Mar 1, 2021, 7:08 AM IST

नवी मुंबई -निसर्ग संरक्षण व संवर्धनाकरिता माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या अभियानांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याद्वारे निसर्गातील पृथ्वी, वायु, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांची माहिती व महत्त्व अधोरेखीत केले जात असून या तत्त्वांच्या संवर्धानाकरिता जागरुकता निर्माण केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत निसर्गाची महती सांगण्यासाठी माझी वसुंधरा प्रचार रथ बनविला आहे.

वापरात नसलेल्या बसचे प्रचाररथात रुपांतर -

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वापरात नसलेल्या बसचे रुपांतर लक्षवेधक प्रचाररथात करण्यात आले आहे. हा रथ 'माझी वसुंधरा प्रचाररथ' म्हणून संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात निसर्गाच्या पंचतत्त्वांचे महत्त्व प्रसारीत करण्यासाठी फिरत राहणार आहे. अत्यंत आकर्षक रंगात नजर वेधून घेईल. अशाप्रकारे हा प्रचाररथ रंगविण्यात आला आहे.

प्रचाररथात औषधी वनस्पतींची रोपटी -

अभिनव पद्धतीने सजविण्यात आलेल्या या प्रचाररथामध्ये ओवा, तुळशी, कोरफड, कडीपत्ता, अडूळसा, वेलची, गवती चहा अशाप्रकारच्या औषधी वनस्पती व देशी फळझाडे या वृक्षरोपांच्या कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून या प्रचाररथाला भेटी देणाऱ्या नागरिकांना त्यांची माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे या प्रचाररथामध्ये पाला पाचोळ्यासारखा ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करावयाची पद्धती त्याचप्रमाणे गांडूळखत बनविण्याची पद्धती या विषयी माहिती मिळण्यासाठी त्याचे पिट्स तयार करण्यात आले आहेत.

बेलापूर ते दिघ्यापर्यत जनजागृती -

हा प्रचाररथ बेलापूरपासून दिघ्यापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी उभा राहून सकाळी 8 ते 11 व संध्याकाळी 4 ते 8 या कालावधीत पर्यावरणाची माहिती प्रसारित करणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

हेही वाचा - खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिला भाजपला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details