मुंबई- कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजाविण्यात आली. त्यामुळे आज सोमवारी मुंबईतील बलार्ड पियर इथल्या ईडी कार्यालयात उन्मेष जोशी सकाळी 11 वाजता दाखल झाले होते. ईडी कार्यालयात जोशींची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली आहे. ईडी सूत्रांच्या माहितीनुसार, उन्मेष जोशी यांना काही प्रश्न ईडीकडून विचारण्यात आले आहेत. हे सर्व प्रश्न उन्मेष जोशी यांच्या कोहिनूर सिटीएनएल या कंपनीशी निगडित आहेत.
उन्मेष जोशी यांची 'ईडी'कडून तब्बल 8 तास चौकशी - ईडी
मुंबईतील बलार्ड पियर इथल्या ईडी कार्यालयात उन्मेष जोशी सकाळी 11 वाजता दाखल झाले होते. यावेळी ईडी कार्यालयात जोशींची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली आहे.
उन्मेष जोशी यांना विचारण्यात आलेले प्रश्न-
1. कोहिनुर सिटीएनएल ही कंपनी कधी आणि कशी स्थापन करण्यात आली ?
2. या कंपनीत किती पार्टनर होते ?
3. कंपनीचे क्लाइंट कोण कोण आहेत ?
4. त्यांचा व्यवसाय काय होता ?
5. कंपनीने कोणा कोणाकडून कर्ज घेतले होते ?
6.आता पर्यंत कोणाचे किती कर्ज फेडले ?
7.अचानक 2008 मध्ये नुकसान कसे झाले ?
उन्मेष जोशी यांना या प्रश्नांबरोबरच कंपनीच्या एकूण बँक खाते, त्यांचे आर्थिक व्यवहार याच्याची निगडित अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तब्बल 8 तास ईडीच्या चौकशी नंतर उन्मेष जोशी यांनी म्हटले की, उत्तम चौकशी झाली. चौकशीला मी सहकार्य केल, मला पुन्हा बोलावणार आहेत.