मुंबई - श्रमिक एक्सप्रेसनंतर रेल्वे मंत्रालयाकडून चालवण्यात येणाऱ्या 200 विशेष गाड्यांपैकी पहिली गाडी रविवारी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाराणसीला रवाना झाली.
कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात जवळपास अडीच महिने लॉकडाऊन करण्यात आला. यानंतर पुन्हा जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या दृष्टीने केंद्राने २०० विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. यात रविवारी रात्री वाराणसीसाठी मुंबईहून एक गाडी सोडण्यात आली.
स्थानकाबाहेर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर त्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश देण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे, ज्या प्रवाशांचे कन्फर्म तिकीट आहे, त्याच प्रवाशांना गाडीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.