मुंबई- 1 मे पासून राज्यामध्ये 18 ते 44 वयोगटात पर्यंतच्या नागरिकांना लसीकरण करण्याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या असल्याने विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठनिहाय लसीकरण केंद्र उभारण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. यासंबंधी आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील लसीकरणासंदर्भात स्पष्टता आल्यानंतर विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना लस देण्यासाठी मोहीम उभारली जाणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलंय.
विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठनिहाय लसीकरण केंद्र उभारा - उदय सामंत - उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण
1 मे पासून राज्यामध्ये 18 ते 44 वयोगटात पर्यंतच्या नागरिकांना लसीकरण करण्याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या असल्याने विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठनिहाय लसीकरण केंद्र उभारण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना वयोगटानुसार लसीकरण करण्यात यावे अशी मागणी करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. विद्यापीठांमध्ये 1 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या 37 लाख आहे. तर 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या 42 लाखापर्यंत जाते. त्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठात वेगळं लसीकरण केंद्र तयार केलं. तर, बाहेर असलेल्या लसीकरण केंद्रावर या तरुणांची गर्दी होणार नाही. यासाठी विद्यापीठामध्ये मॉडेल ठरवणं आवश्यक असून विद्यापीठ निहाय लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याच उदय सामंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी ऑक्सिजन कमतरता नाही
ऑक्सिजनची कमतरता सुदैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी प्रमाणात असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. सहा महिन्या पुर्वीच सिंधुदुर्गात ऑक्सिजन जनरेट प्लांट तयार करण्यात आला आहे. तसेच अजून चार नवीन प्लांट सिँधुदुर्गात तयार होणार आहेत. त्यामुळे एका महिन्यामध्ये सिंधुदुर्गात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. तसेच रत्नागिरी मध्ये देखील तीच दक्षता घेतली असून रत्नागिरी जिल्ह्यात दहा हजार लिटर पर मिनिट प्रकल्प सुरू झाला आहे. केवळ FDA ची परवानगी बाकी असून ती परवानगी मिळाल्यानंतर लगेचच हा प्लांट सुरू होणार आल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. तसेच रत्नागिरीत अजून सहा नवीन ऑक्सीजन प्लांट येत्या काही दिवसात सुरू होणार आहे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे संकेत
पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यात तिसरी लाट येऊ शकते, त्यासाठी सज्ज राहावे लागेल असे संकेत दिले असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी ऑक्सीजन प्लांट हे आवश्यक आहेत. हे ओक्सिजन प्लांट कोरोना गेल्यानंतरही उपयोग येणार असल्याने त्यांची निर्मिती आवश्यक असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
TAGGED:
उदय सामंत बातमी