मुंबई :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 , (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर विधेयकात (UGC Exchanging Appointment Bill) करून विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या (VC Search and Selection Committee) व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद करणारे विधानसभा विधेयक (Legislative Assembly) आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी मांडले.
काय आहे विधेयक ?
राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड करताना यापुढे कुलगुरू शोध व निवड समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)च्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात येणार आहे. तर, कुलगुरूंनी केलेली शिफारस विचारात घेऊन प्र-कुलगुरूची नियुक्ती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा अध्यादेश काढल्यानंतर सरकारने याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडले.