मुंबई - युनिसेफने तयार केलेल्या 'महाकरिअर पोर्टल'वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 556 अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. यासोबतच या पोर्टलवर 21 व्यावसायिक संस्थांची माहितीही उपलब्ध करण्यात आली आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या पोर्टलचाफायदा होणार आहे. युनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या पोर्टलचे उद्घाटन शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महाकरिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.