महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामदास आठवलेंनी घेतली मदन शर्मा यांची भेट; न्यायासाठी गृहमंत्री शाह यांना घालणार साकडे - retired Navy officer Madan Sharma news

मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर सोनिया गांधी व शरद पवार यांच्या फोटोला नमस्कार करणारे उद्धव ठाकरे यांचा फोटो फॉरवर्ड केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

Ramdas Athawale
रामदास आठवले

By

Published : Sep 13, 2020, 12:38 PM IST

Updated : Sep 13, 2020, 2:27 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर शिवसेनेविरोधात भाजपा आणि आरपीआय आक्रमक झाले आहेत. आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांची भेट घेत, या मारहाणीचा निषेध केला. मदन शर्मा यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

न्याय मिळवून देण्यासाठी आठवले घेणार गृहमंत्री शाह यांची भेट

कांदिवली येथे राहणाऱ्यामदन शर्मा यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे हात जोडून उभे आहेत, अशा आशयाचे हे चित्र होते. याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मदन शर्मा यांना दूरध्वनीवरून जाब विचारला. त्यानंतर त्यांनी शर्मा यांना मारहाण केली. यात शर्मा यांच्या डोळ्याला जखम झाली. हा सर्व प्रकार त्यांच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मला पळवून मारले आहे. मात्र, पोलिसांनी चुकीचे कलम लावले आहेत. त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. मला झालेल्या मारहाणीनंतर मला बोलायला जमत नाही. मला एका डोळ्याने कमी दिसत आहेत. देशात न्यायव्यवस्था टिकली पाहिजे, म्हणून मी या घटनेबाबत न्याय मागत आहे, असे शर्मा यांनी सांगितले

मदन शर्मा यांना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर योग्य ते कलम लावले नाही आहे. यामुळे त्यांना एका दिवसात जामीन मिळाला. शर्मा यांना न्याय मिळावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे व शर्मा यांना न्याय मिळवून देणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

Last Updated : Sep 13, 2020, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details