महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा - रामदास आठवले - हाथरसच्या मुलीवरील अत्याचार घटना

हाथरसच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येचा गुन्हा हा माणुसकीची हत्या आहे. या प्रकरणातील निधन झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची 2 ऑक्टोबरला आठवले सांत्वनपर भेट घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ते पीडितेच्या कुटुंबाला सांत्वनपर आर्थिक मदत करणार आहेत.

रामदास आठवले
रामदास आठवले

By

Published : Sep 30, 2020, 10:35 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसच्या चांडपा गावात 19 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. उपचार सुरू असताना 14 दिवसांनी या मुलीचे निधन झाले. ही अत्याचाराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे सांगत आठवले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

हेही वाचा -युपी सामूहिक अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उद्या (गुरुवार) या प्रकरणाच्या निषेधसाठी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. हाथरसच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येचा गुन्हा हा माणुसकीची हत्या आहे. या प्रकरणातील निधन झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दिनांक 2 ऑक्टोबरला आठवले सांत्वनपर भेट घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ते पीडित शोकाकूल परिवाराला सांत्वनपर आर्थिक मदत करणार आहेत.

हेही वाचा -हाथरस सामूहिक बलात्कार : योगी आदित्यनाथ यांच्या राजीमान्याची काँग्रेसकडून मागणी

उत्तर प्रदेश सरकारने पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. आरोपींना कठोरात-कठोर फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची दि. 3 ऑक्टोबर रोजी आपण भेट घेणार आहोत, असे आठवले यांनी संगितले. दरम्यान, आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हाथरसच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या अमानुष गुन्ह्याच्या निषेधार्थ अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यावर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details