मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ज्या पद्धतीने या सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेले दिसत आहेत ते पाहता हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. मुंबईतील त्यांच्या निवस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांची बारामतीत फक्त डायलॉगबाजी -
मुख्यमंत्र्यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाचं कौतुक केलं. यावर राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत होते. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते गप्प झालेले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लालसेमुळे आता त्यांना पवार कुटुंबीयांचं कार्य म्हणजे विकासाचे कार्य असे वाटत आहे. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेने सरकार स्थापन होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली होती. तेच बारामतीला जाऊन पवार कुटुंबीयांचे कौतुक करतात. एक शेतकऱ्यांचा साधा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नाही. शरद पवारसारखा लाचार माणूस नाही, असे सांगणारे उध्दव ठाकरे त्याच शरद पवारांकडे मुख्यमंत्री होण्यासाठी लाचार झाले. मुख्यमंत्री बारामतीला फक्त डायलॉग बाजी करून आले, अशी टीकाही नारयण राणेंनी केली.
हेही वाचा -कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवार पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थितीत; शरद पवारांनी दिले उत्तर