महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane on Sushant Disha : दिशा सालियानवर बलात्कार, हत्या.. - नारायण राणेंचा दावा

8 जूनला दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. मात्र, आत्महत्या केल्याचे सांगितले गेले. याची माहिती सुशांतला मिळाली होती. तो या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार होता. त्यामुळे काही लोकांनी जे दिशाच्या हत्येला जबाबदार आहेत, त्यांनी सुशांतची हत्या केली. तसेच ही हत्याही आत्महत्या दाखवण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत त्यांनी काल एक ट्विटही केले होते.

union minister narayan rane on disha salian in pc
दिशा सालियानवर बलात्कार झाला - केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा

By

Published : Feb 19, 2022, 11:39 AM IST

Updated : Feb 19, 2022, 12:50 PM IST

मुंबई - 8 जूनला दिशा सालियनवर बलात्कार झाला. मात्र, आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. ती पार्टीला जात नव्हती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार होत असताना पोलीस संरक्षण कुणाला होतं हे महत्त्वाचं आहे. तिची पोस्ट मार्टम रिपोर्ट नाही आला. त्यानंतर दिशा सालियन सुशांत सिंह याला जेव्हा कळलं तेव्हा तो बोलला की मी यांना सोडणार नाही. तेव्हा हे लोक त्याच्याकडे तिक़डे गेले. तिथे बाचाबाची झाली. यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

त्याठिकाणी कोणत्या मंत्र्यांची गाडी होती तिथले कॅमेरे कसे गायब झाले. 13 जूनला रात्री सीसीटीव्ही बंद होते. सर्व पुरावे नष्ट कोणी केले याची चौकशी होणार आहे. त्यात कोणते अधिकारी होते. सुशांत सारख्या तरुण कलाकाराची हत्या झाली, असा दावाही त्यांनी केला.

दोन्ही इमारतींचे प्लान माझ्याकडे -

मी काल दिल्लीला होतो. माझ्या घराला नोटीस आली. याबाबत आज वास्तविक चित्र सांगणार आहे. या घरांत मी 17 सप्टेंबर 2009ला आलो. 14 वर्ष झाली. या इमारतीचे आरकेटीक जगात नामांकित आहेत. 1991 च्या कायद्याप्रमाणे इमारत बांधली. याबाबतची कायदेशीर पूर्तता मनपा कडून केली. कायदेशीर काम केलं. एक इंच ही काम त्यानंतर केलं नाही. माझी दोन मुलं, त्यांच्या पत्नी असे मिळुन आम्ही आठ लोक राहतो. 100 टक्के कायदेशीर इमारत असताना मातोश्री कडून तक्रार करायला लावली. मनपाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. हा दुष्टपणा आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मातोश्री 2 काढली. आम्ही काही बोललो नाही. दोन्ही इमारतीचे प्लान माझ्याकडे आहेत. मात्र, आम्ही असे धंदे करत नाही.

दिशा सालियनवर बलात्कार -

प्रदीप भालेकर या आरटीआय कार्यकारीनी ट्विट केलं आहे. तक्रार करणारा सिंधू दुर्गातला माणूस आहे. राजकीय सूड बुद्धीने तक्रार केली. शिवसेनेत असताना घर बांधायला सुरवात केली. साहेब हयात असते तर ते पण आले असते. सुबुद्धीचे लोक सत्तेत आहेत, हे दुर्दैवी आहे. आमच्या कडे काही माहिती आहे. दिशा सलीयन हीच बलात्कार करून हत्या झाली. ती त्या पार्टीला जात नव्हती, जबरदस्तीने तिला बोलावलं. तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा सुरक्षा कोणाची होती? दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीतील इन्ट्री रजिस्टर मधील 8 जून ची पाने का नाहीत? सुशांत सिंह याने याबाबत कोणाला सोडणार नाही, असे म्हटल्या मुळे घरी जाऊन त्याची हत्या झाली असा दावा त्यांनी केला.

मुंबईत देशभराचे कलाकार येतात, त्यांची हत्या झाली. रमेश मोरेची हत्या कोणी केली? जया जाधव यांची हत्या का झाली? पण आम्ही हे काढलं नाही. अजून खोलात जाईल. आम्हाला राजकारण कोणी शिकवू नये. आपण दुष्ट बुद्धीने काही करत नाही. मराठी माणूस मुंबईतून तडीपार झाला. दोन वर्षात मराठी माणसासाठी काय केलं? असा सवाल करत हे लोक फक्त राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका -

8 माणसांसाठी एवढी इमारत असताना अजून काय वाढणार आम्ही? या सव्वा दोन वर्षात शिवसैनिकांना काय मिळाले आणि मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. मात्र, आता उभे राहायला पण दोन माणसं लागतात, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. मराठी माणसाला देण्यासाठी काही तरी करा. मंत्रालयात कॅबिनमध्ये आणि सभागृहात पण मुख्यमंत्री जात नाही. गुणवत्ता आणि पात्रता नसताना सव्वादोन वर्ष काढलं, अशी टीकाही त्यांनी केली. बाळासाहेब यांनी आम्हाला घडवलं. म्याव म्याव चा याला त्रास झाला. मात्र, स्वतःला वाघ म्हणणारे स्वतः म्याव म्याव झाले, अशी टाकीही त्यांनी केली.

पुरावे कोणाकडे सादर करायचे हे मला कोणी सांगू नका. भुजबळ ज्यासाठी अडीच वर्ष आत गेले तेच गुन्हे मतोश्रीवरचे आहेत. ते सर्व पुरावे मी देणार आहे. मी पहिल्यापासून व्यावसायिक आहे. कोणाकडून खून करून काही मिळवलं नाही, असेही ते म्हणाले.

सुशांतने केली होती आत्महत्या

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन गट निर्माण झाले. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला गेला. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर वर्ष उलटूनही या तपासाला विराम देण्यात आलेला नाही. या प्रकरणामध्ये ड्रगचा मुद्द समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले. सुशांतची कथित गर्ल फ्रेंड रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुशांतचा रुममेट सिध्दार्थ पिठानी याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर एम्सने दिलेल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र सीबीआयने अद्यापही याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवलाय.

असा झाला होता दिशाचा मृत्यू

28 वर्षीय दिशा सालियानने 8 जून रोजी मलाड भागातील एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूच्या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल नोंदविला गेला आहे. दिशा सालियान मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे आणि उच्च न्यायालयाने त्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. तथापि, दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 19, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details