मुंबई -2023 च्या नवीन वर्षात राजकीय हालचाली शांत होतील अशी चर्चा होती. मात्र, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेल्याने ( Narayan Rane Meet Raj Thackeray ) सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 2023 चे नवीन वर्षात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ( Brihanmumbai Municipal Corporation ) निवडणूक असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे, राज ठाकरे यांच्यात काही चर्चा होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Narayan Rane Meet Raj Thackeray : नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वरील भेटीने राजकीय चर्चा सुरू
केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Nirman Sena President Raj Thackeray ) यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतिर्थ निवास्थानी दाखल झाले होते. ( Narayan Rane meet Raj Thackeray ) नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीव वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीमागचे नेमके कारण (Narayan Rane at Shivtirtha) अद्याप समजू शकले नाही.
राणे राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक -एका बाजूला नारायण राणे, राज ठाकरे यांची मैत्रीचे किस्से वेळोवेळी चर्चेला येत असतात. तर, दुसरीकडे शिवसेना सोडल्यापासून नारायण राणे, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने त्यांच्यात नेमकी काय चर्चा होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज ठाकरेंची भाजपशी जवळीक - राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भाजपशी अधिकच जवळीक वाढली आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. मात्र, आता नारायण राणे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याने या चर्चेत नेमकं काय घडतं? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होते का? काही वाटाघाटी होते का? हे पहाण महत्त्वाच आहे.