मुंबई :राज्यात नव्या समीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. मातोश्री येथे पक्ष प्रवेश झाला यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते.
ठाण्यात ठाकरेंची क्रेज : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिंदे गट तसेच काहीनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली असताना इतर पक्षातून ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. यातच आज केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. ठाण्यात भाजपचा प्राबल्य वाढत असला तरी ठाण्यात ठाकरे आडनावाची क्रेज कायम आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातील हातावर मोजण्या इतके कार्यकर्ते सोडले, तर जवळपास सर्वच जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या परिस्थितीतही ठाकरे यांनी आपल्या सेनेचा दबदबा कायम राखला आहे.