मुंबई: याप्रसंगी बोलताना राजीव पवार म्हणाले की निवडणुकीच्या अनुषंगाने सादर होणारा हा अर्थसंकल्प नक्कीच आशा दायक असणार आहे. यामध्ये काही वाद नाही. परंतु एकंदरीत वित्तीय तूट भरून काढणे हे सुद्धा अर्थमंत्री यांच्या समोर फार मोठे आव्हान असणार आहे. कारण करोनाच्या महामारी मध्ये ज्या पद्धतीने मागील दोन वर्षांमध्ये वित्तीय तूट मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेली आहेत. ती पाहता यंदा ही वित्तीय तूट लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर करणे हे सुद्धा एक आव्हानात्मक असणार आहे. मागील ८ वर्ष करामध्ये दिलासा दिला गेला नाही आहे. परंतु त्याचा विचार यंदा होण्याची शक्यता वर्तवली जात असून तशी आशा करायला हरकत नाही. असेही पवार म्हणाले.
Union Budget 2023: वित्तीय तूट भरून काढणे आव्हान - राजीव पवार - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना फार मोठ्या अपेक्षा असल्या तरी बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पातून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या संदर्भामध्ये आयएमसीचे राजीव पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे.
राजीव पवार
अर्थसंकल्प सादर:वर्षे 2022-23 मध्ये भारतीय शेतीने चांगली कामगिरी केल्याचे म्हणटल्या गेले. तर गेल्या सहा वर्षात कृषी क्षेत्राचा सरासरी वार्षिक विकास दर 4.6 टक्के राहीला आहे. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन 2023-24 चा सर्वसामान्य अर्थसंकल्प सादर करतील. तेव्हा देशाचा कणा मानल्या जाणाऱ्या कृषी अर्थ व्यवस्थेवर यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा काय परिणाम होणार आहे.
हेही वाचा: Budget 2023 यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना या आहेत प्रमुख अपेक्षा
Last Updated : Feb 1, 2023, 12:33 PM IST