मुंबई- केंद्रीय अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर मार्केट तेजीत आहे. सेन्सेक्सने ४० हजार तर निफ्टीने ११ हजारांचा टप्पा गाठला आहे. आजचे बजेट गुंतवणूक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र तसेच निर्माण क्षेत्रासाठी फायद्याचे असणार असल्याचे मत अर्थ तज्ञांनी व्यक्त केले आहे.
घरगुती खर्च वाढणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्यांदाच एक महिला केंद्राचे बजेट मांडत आहे. त्यामुळे एक महिला आपल्या देशाच्या कुटुंबाचा विचार करूनच बजेट सादर करील. याचा फायदा सर्वसामान्यांपासून सर्व स्तराच्या लोकांना होईल असे, आर्थिक निर्देशक व गुंतवणूकदारांनी मत व्यक्त केले आहे.