मुंबई - वडाळा रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारी एका छताच्या खांबाखाली एक बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षा दलाने वेळीच बॅग असलेला परिसर बंद करून बॉम्ब शोधक पथक बोलावून श्वानामार्फत तपासणी करून बेवारस बॅग तपासण्यात आली.
वडाळा रेल्वे स्थानक परिसरात आढळली बेवारस बॅग; परिसरात भीतीचे वातावरण - बेवारस बॅग
वडाळा रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारी एका छताच्या खांबाखाली एक बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वेळीच रेल्वे सुरक्षा दलाने बॉम्ब शोधक पथक आणि बॉम्ब शोधक स्वान परिसरात दाखल करून बेवारस बॅगेची तपासणी केली.

वडाळा रेल्वे स्थानक परिसर हा कायम वर्दळीचा भाग असतो. वडाळा हे हार्बर मार्गावरील जंक्शन असल्याने बेवारस बॅग आढळून आल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच रेल्वे सुरक्षा दलाने बॉम्ब शोधक पथक आणि बॉम्ब शोधक स्वान परिसरात दाखल करून बेवारस बॅगेची तपासणी केली. या बॅगेत दैनंदिन वापरातील कपडे तसेच काही वस्तू आढळून आल्या. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील भीतीचे वातावरण कमी झाले. घटनेचा अधिक तपास वडाळा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल करत आहेत. संबंधित बॅग रेल्वे स्थानक परिसरात कशी आणि कोणी ठेवली याबाबत सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.