मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बॉलिवूड माफियासोबत संबंध असल्याचा आरोप केला. बॉलिवूडमधील लोकांशी संगनमत करूनच माझे कार्यालय तोडण्यात आल्याची टीका कंगनाने केली होती. याबाबत मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये कंगना रणौत हिच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना रणौत विरोधात विक्रोळीत अदखलपात्र गुन्हा दाखल - कंगना रणौत लेटेस्ट न्यूज
बुधवारी कंगनाने एक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसारित केला होता. ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बॉलिवूड माफियासोबत संबंध असल्याचा आरोपही केला. त्यामुळे तिच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वकील नितीन माने यांच्याकडून विक्रोळी कोर्टामध्ये यासंदर्भात अब्रू नुकसानीचा दावासुद्धा केला जाणार आहे. बुधवारी कंगनाने एक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसारित केला होता. ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. 'उद्धव ठाकरेने माझे घर तोडले, लवकरच त्याचा इगो मी तोडेल' असे कंगनाने म्हटले. कंगनाच्या घरावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे, त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नाही, असे नितीन माने यांनी सांगितले.
कंगना रणौतच्या पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने काल कारवाई केली. मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईवर स्थगिती आणली आहे. या बरोबरच आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही महानगरपालिकेला दिले आहेत.