महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलवामा हल्ला : 'या 'महाराष्ट्राच्या सुपुत्राने ४० हुतात्म्यांच्या घरची माती केली गोळा, आज हुतात्मा स्मारकावर ठेवून वाहिली श्रद्धांजली

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या हल्ल्यामध्ये ४० जवानांना वीरमरण आले होते. एका महाराष्ट्राच्या पुत्राने या सर्व हुतात्मा जवानांच्या घरी भेट देवून आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत, असे सांगत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या घरची माती गोळा केली. आज पुलवामा येथे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ लेथपोरा भागातील कँम्पमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. आज या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उमेश यांची विशेष उपस्थिती होती.

umesh gopinath jadhav
उमेश जाधव

By

Published : Feb 14, 2020, 11:43 AM IST

Updated : Feb 14, 2020, 12:05 PM IST

मुंबई -पुलवामा हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या ४० जवानांचे घरची माती आणून हुतात्मा स्मारकावर ठेवण्यात आली. हे कार्य एका महाराष्ट्राच्या सुपुत्रामुळे केले आहे. उमेश गोपीनाथ जाधव(३९), असे या मराठी सुपुत्राचे नाव आहे. त्यांनी १६ राज्यातील सर्व हुतात्मा जवानांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन देखील केले.

'या 'महाराष्ट्राच्या सुपुत्राने ४० हुतात्म्यांच्या घरची माती केली गोळा

पुलवामा हल्ल्याची बातमी ऐकताच मी स्तब्ध झालो -

उमेश जाधव हे मूळचे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या १६ वर्षांपासून ते कर्नाटकातील बंगळुरूमध्ये राहतात. जाधव राजस्थानला त्यांच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी अजमेर विमानतळावर बसले असताना त्यांना पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये ४० जवानांना वीरमरण आल्याची बातमी समजली.

माध्यमांवर बातमी बघताच मी स्तब्ध झालो. काय करायचे सुचत नव्हते. मात्र, काहीतरी विशेष करून हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यायची होती. पण, त्यासाठी काय करायचे हे मात्र माहिती नव्हते. त्यानंतर मी विचार केला आणि सर्व हुतात्मा जवानांच्या घरची माती गोळा करून त्यापासून पुलवामा येथे भारताचा नकाशा तयार करण्याचे ठरवले. या हुतात्मा जवानांमुळे आपला देश कसा तयार झाला आणि देश कसा सुरक्षित राहतो? याबाबत मला जनतेला संदेश द्यायचा आहे, असे उमेश जाधव यांनी सांगितले.

लेथपोरा येथे हुतात्मा स्मारकाजवळ उपस्थित उमेश जाधव

कोण आहेत उमेश जाधव -

उमेश यांनी फार्मसीमध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी काही कंपनीमध्ये काम केले. मात्र, संगीतामध्ये आवड असल्याने शेवटी संगीतकार झाले. त्यानंतर त्यांनी 'म्युझीकॉज' हा बँड देखील तयार केला. या बँडद्वारे केलेल्या कार्यकक्रमांमधून काही निधी गोळा झाला होता. तो देखील पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना देण्याचे त्यांनी ठरवले होते.

कर्नाटकमधून ९ एप्रिल २०१९ पासून प्रवासाला सुरुवात -

उमेश यांनी ठरवल्यानुसार ९ एप्रिल २०१९ पासून कर्नाटक येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर केरळ, तमिळनाडू, गोवा, पाँडेचेरी, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि जयपूर असा प्रवास त्यांनी केला. त्याठिकाणी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना भेट दिली. तसेच त्यांचे सांत्वन केले. एक अनोळखी व्यक्ती आपल्या कुटुंबाला भेट द्यायला आला, हे पाहून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर होत होते. कोणाचा पती, कोणाचा मुलगा, कोणाचा बाप, तर कोणाचा भाऊ या हल्लामध्ये हुतात्मा झाला होता. त्यामुळे त्या सर्व कुटुंबीयांना मदत करत त्यांचे सांत्वन केले. तो क्षण माझ्यासाठी आणि त्या कुटुंबीयांसाठी देखील अतिशय भावूक होता, असे उमेश जाधव यांनी सांगितले.

लेथपोरा येथे हुतात्मा स्मारकाजवळ सीआरपीएफच्या जवानांच्या गोळा केलेली माती देताना उमेश जाधव

मी एका भारतीय नागरिकाचे कर्तव्य पूर्ण केले -

पुलवामा येथे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ लेथपोरा भागातील कँम्पमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. आज या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उमेश यांची विशेष उपस्थिती होती. मी एका भारतीय नागरिकाचे कर्तव्य पूर्ण केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच येत्या ९ एप्रिल २०२० ला हा प्रवास पूर्ण होणार असल्याचे उमेश यांनी सांगितले.

Last Updated : Feb 14, 2020, 12:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details