मुंबई- २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवत असल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. लाहोरवरुन गुजरणवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली. या अटकेवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मत व्यक्त केले आहे.
हाफिजला अटक करून पाकिस्तान सर्व जगाला मूर्ख बनवतंय - उज्वल निकम - hafiz saeed arrest
लाहोरवरुन गुजरणवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली. या अटकेवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मत व्यक्त केले आहे.
![हाफिजला अटक करून पाकिस्तान सर्व जगाला मूर्ख बनवतंय - उज्वल निकम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3864354-thumbnail-3x2-ujwal.jpg)
हाफिज सईदला अटक करुन पाकिस्तान सर्व जगाला मूर्ख बनवत आहे. न्यायालयामध्ये सईदविरुद्ध पाकिस्तान कसे पुरावे सादर करतोय, तसेच त्याला दोषी ठरवण्यासाठी किती प्रयत्न करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे एक नाटक ठरेल, असे निकम म्हणाले.
हाफिज सईद जमात-उल-दावा या संघटनेचा प्रमुख आहे. भारतामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये अनेक वेळा त्याचा सहभाग सिद्ध झाला आहे. हाफिज सईदची संघटना ‘जमात-उल-दावा’ आणि त्याला रसद पुरवणारी संस्था ‘फलाह-ए-इन्सानियत’ फाउंडेशनवरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्राने सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.