मुंबई -काही केल्या उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रामराजे नाईक निंबाळकर हे वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
साताऱ्याच्या २ राजेंमधला वाद टोकाला, ते माझ्या वयाचे असते तर... उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा - satara
काही केल्या उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रामराजे हे वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली होती. या बैठकीतून उदयनराजे उठून गेले. त्यावरुनच उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलो तर मला रेबीज होईल
पिसाळलेल्या कुत्र्या सोबत राहिलं तर मला रेबीज होईल. कुणाचेही ऐकून घ्यायला मी लेच्यापेच्या नाही. मी उदयनराजे आहे. महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागते असेही उदयनराजे म्हणाले. मी चक्रम आहे, लोकांवर अन्याय झाला की मी चक्रम होतो, असेही उदयनराजे म्हणाले. शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या, मी सहन करणार नसल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.