मुंबई - अयोध्येनंतर शिवसेनेने आता विधानसभा निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू केली आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख आणि उपसंपर्क प्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत विधानसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
उद्धव ठाकरेंनी घेतला २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा - communicator cheif
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख आणि उपसंपर्क प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक बोलावली. या बैठकीत विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीला आढावा घेतला.
आगामी विधानसभा निवडणुकीतही युती होणार असल्याचे शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या मतांची आणि सद्यपरिस्थितीची चाचपणी केली आहे.राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाल्यास कुठल्या जागा मागाव्यात तसेच कुठल्या जागा निवडून आणण्यासाठी सोप्या जातील, कुठल्या जागेवर अधिक मेहनत करावी लागेल, याचा शिवसेनेने आढावा अहवाल तयार केला असून त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. यानुसार आता पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसाठीची चाचपणी घेण्यात आली.