मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मातोश्री परिसरात मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.
संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ - uddhav thackery
शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदींना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा-खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदींना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जवळपास 700 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे.