मुंबई- वीरमरण आलेले हेमंत करकरे यांच्यावर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि मित्रपक्ष अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्यावरुन देशभरात वादंग निर्माण झाले आहे. साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अशात आता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाग येऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यांना जे काही सांगायचे होते ते त्या व्यवस्थित सांगू शकत होत्या. मात्र, देशासाठी जे हुतात्मा झाले आहेत, त्यांचा अपमान कोणी करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी या विषयावर संपूर्णपणे बोलणे टाळले आहे.