महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही आघाडीसोबत जातोय, त्यासाठी भाजपनेच शुभेच्छा दिल्या - उद्धव ठाकरे - महाराष्ट्र सत्ता स्थापन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा शिवसेना आमदारांशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे

By

Published : Nov 12, 2019, 8:28 PM IST

Updated : Nov 12, 2019, 8:53 PM IST

मुंबई- भाजपचा पर्याय मी संपवलेला नाही, त्यांनी संपवला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते सत्तेत येणार की, नाही हे स्पष्ट नव्हते तरी मी त्यांच्यासोबत गेलो. त्यावेळी युती करताना जे ठरले होते ते त्यांनी पाळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा शिवसेना आमदारांशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असल्याचे सांगितले.

राज्यपाल दयावान माणूस -

काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती, तशीच शिवसेनेलाही हवी होती. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ हवी होती. त्यासाठी वेळ वाढवून मागितला, पण राज्यपाल म्हणाले 48 तास नाही तर 6 महिने देतो, त्यांचं गणित मला अजून समजलेलं नाही. त्यामुळे राज्यपाल हे दयावान माणूस आहेत, त्यांनी 48 तासांऐवजी 6 महिन्यांची मुदत दिली, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लगावला.

भाजप-पीडीपी, भाजप-नीतीश यांचा मिलाफ कसा झाला?

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संपर्क साधला. आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहे असं म्हणत होता, त्यांना ते उत्तर होते, आता उत्तर मिळाले असेल, असाही टोला ठाकरेंनी लगावला. तसेच भाजप-पीडीपी, भाजप-नीतीश यांचा मिलाफ कसा झाला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रपती राजवटीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

Last Updated : Nov 12, 2019, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details