महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंचा शपथविधी लाखो शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक प्रसंग - दिवाकर रावते - शिवतीर्थ

राज्यात जनतेचे सरकार तयार होत आहे. याला साक्षीदार म्हणून पहिल्यांदा राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर जमा झाले आहेत. माननीय उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा  ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिवाकर रावते यांनी दिली.

दिवाकर रावते
दिवाकर रावते

By

Published : Nov 28, 2019, 4:53 PM IST

मुंबई - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या रूपाने राज्यात आमचा मुख्यमंत्री होत आहे. ही भावना प्रत्येक घराघरात आहे. त्याचाच जल्लोष साजरा होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी दिली.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी लाखो शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक प्रसंग


राज्यात जनतेचे सरकार तयार होत आहे. याला साक्षीदार म्हणून पहिल्यांदा राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर जमा झाले आहेत. माननीय उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; दोन्ही शिवसेनेचेच
मागील पाच वर्षांत उद्धव साहेब कधीही शेतकऱ्यांचे दुःख विसरले नाहीत. आताही सर्वांत अगोदर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असे रावते यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊनच राज्यातील जनतेची सेवा करेल. लवकरच हा सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती रावते यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details