महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे उद्धव ठाकरेंकडून काम; भाजपचा ठाकरेंवर जोरदार प्रहार - BJP strongly attacked Thackeray

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हिंदूमध्ये फुट पाडत अल्याचा आरोप ( Ashish Shelara criticizes Uddhav Thackeray ) मुबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार ( BJP Mumbai President MLA Ashish Shelar ) यांनी केला आहे. ते आज भाजप सहकार, शिक्षक आघाडीच्यावतीने दहीसर पूर्व येथे जागर मुंबईचा या अभियानांतर्गत ( campaign of Jagar Mumbai ) १७ व्या सभेवेळी बोलत होते.

BJP leader Ashish Shelar
आशिष शेलार

By

Published : Nov 27, 2022, 10:14 PM IST

मुंबई - भाजप सहकार, शिक्षक आघाडीच्यावतीने दहीसर पूर्व येथे जागर मुंबईचा या अभियानांतर्गत ( campaign of Jagar Mumbai ) १७ वी सभा संपन्न झाली. या प्रसंगी बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार ( BJP Mumbai President MLA Ashish Shelar ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली ( Ashish Shelara criticizes Uddhav Thackeray ) आहे.

फ्री काश्मीरचे पोस्टर दाखवणाऱ्यावर कारवाई का नाही - या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, लांगूलचालन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजींमुळे महेक प्रभू नावाची मुलगी गेट वे ऑफ इंडियाला उभी राहून फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन उभी राहते. तिच्यावर साधी एनसी देखील झाली नाही. आमच्या गल्लीबोळात १० नंतर बँजो वाजवला तर, पोलिस येऊन गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतात.

खोटं बोलण्यात उद्धव ठाकरेंना प्रथम क्रमांक - खोटं बोलण्याची स्पर्धा असती तर, उद्धवजी ठाकरेंना प्रथम क्रमांक मिळाला असता. मी जर मुख्यमंत्री असतो तर, महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढलं असतं, असं उद्धवजी ( Uddhav Thackeray ) काल म्हणाले. मी विचार केला खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर प्रथम क्रमाकांचे बक्षिस उद्धवजींना मिळेल. इतके धादांत खोटे बोलतात ते. महिलांचा अपमान कुणीच करु नये, आम्ही त्याचा निषेध करतो.

ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल - पण महिलेच्या अपमानामुळे मंत्र्याला काढून टाकावे, असे उद्धवजींना वाटतं. त्यांच्या मंत्रिमंडळात मात्र एक मंत्री दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करतो. काळा पैशाने तिची प्रॉपर्टी विकत घेतो, तोच काळा पैसा बॉम्बस्फोटात वापरलो जातो, असे एएनआय म्हणते. त्या मंत्र्याला काढावेसे उद्धवजींना वाटले नाही? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच सर्जिल उस्मानी सारखा सडक्या मेंदूचा माणूस महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्माचा अवमान करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही मागणी करतो. पण लांगूलचालन करणारा मुख्यमंत्री असल्यामुळे सर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल केला नाही, असेही ते म्हणाले.

हिंदूमध्ये फूट पाडण्याचे काम?आशिष शेलार म्हणाले की, २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही 'सबका साथ सबका विकास' करीत आहोत. तुष्टीकरण्याच्या, लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे.

मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला. मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांच्याकडून आफताब - श्रद्धा वालकरच्या प्रकरणात साधा निषेधही व्यक्त करण्यात आलेला नाही. मराठी, मुस्लिमांना फसवण्याचे काम उद्धवजींच्या सेनेकडून सुरू आहे. हिंदू , मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details