मुंबई- मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही कार्यकर्त्यांनी 'मातोश्री'बाहेर बॅनरबाजी करून आंनदोत्सव साजरा केला. संजय दत्तात्रय भालेकर व बाळा चव्हाण यांनी हे बॅनर लावले आहेत.
उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 'मातोश्री'बाहेर झळकले बॅनर - देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.
उद्धव ठाकरे
हेही वाचा -मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार - अजित पवार
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.