मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख रविवारी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी तसेच ओला दुष्काळात झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सत्तार यांनी आज (शुक्रवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत, आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती - uddhave thakre will be aurangabad
परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे, यांसंबंधित माहिती पक्षप्रमुखांनी दिल्याचे सत्तार यांनी सांगितले.
हेही वाचा -राऊतांनी घेतली पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे, यांसंबंधित माहिती पक्षप्रमुखांनी दिल्याचे सत्तार यांनी सांगितले. पूर्वी जी चर्चा झाली तीच अंतिम आहे. भाजपने तसे मान्य न केल्यास पुढची रुपरेषा आणि दिशा ठरवली जाईल. जोपर्यंत भाजप अध्यक्ष अमित शाह शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठींना फोन करून चर्चा करत नाही. तोपर्यंत सत्ता स्थापन करणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हे ठरल्याप्रमाणे हवे, अशी भाजप-शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.