मुंबई MLA Disqualification Case:शिवसेनेचे 16 आमदार अपात्र प्रकरणी आज विधानसभेत सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी आजच्या सुनावणीत दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद झाला. दरम्यान दोन्ही गटाकडून जवळपास तीन ते साडेतीन तास युक्तिवाद झाला. आम्हाला पुरावे जमा करण्यास आणि ते सादर करण्यास आणखी 14 दिवसांची मुदत मिळावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलाने केली, मात्र यावर ठाकरे गटाच्या वकिलाने आक्षेप घेत 14 दिवसाची मुदत कशाला पाहिजे? असा सवाल उपस्थित केला. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला.
युक्तिवादादरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये बाचाबाची: शिंदे गटाच्या वकिलांकडून आणखी 14 दिवसाचा वेळ मागितला आहे. मात्र यावर ठाकरे गटाने आक्षेप (Uddhav Thackeray vs Eknath Shinde घेतला. सर्व अपात्रतेच्या याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ मिळावा, असं शिंदे गटाकडून मागणी केली. तसेच ज्यावेळी आमदार उदय सामंत (Uday Samant ) हे ठाकरे गटात होते. त्यावेळी शिंदे गटाच्या विरोधात केलेल्या याचिकेवर त्यांची सही असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण केलेल्याच सहीवर आक्षेप कसा घ्यायचा असा प्रश्न सामंत यांच्यासमोर आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
एकत्र सुनावणी झाल्यास आमच्यावर अन्याय :याआधीही झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं होतं. एकत्र सुनावणी घेतली जावी, अशी ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी आहे. मात्र तर तसं केल्यानं शिंदे गटाच्या आमदारांवर अन्याय झाल्यासारखं होणार आहे. त्यामुळे याचिका एकत्र केल्या तर तो त्यांचा अधिकार राहणार नाही, असंही देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं होतं. याप्रकरणी आम्ही अध्यक्षांना लवकर सुनावणी घेण्यास सांगितलं असून 20 तारखेपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.