मुंबई : मुंबई : धडाडीची युवा कार्यकर्त्या आणि युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे बुधवार मध्यरात्री ह्दयविकाराने निधन झाले. ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. दर्शन घेतांना उद्धव ठाकरे सुन्न तर रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते. ठाकरेंना भावुक होताना पाहून शिवसैनिकांचा कंठ दाटून आला. अतिशय खिन्न मनाने शिवसैनिकांनी दुर्गा भोसलेंचा जयघोष करत अखेरचा निरोप दिला.
Durga Bhosale Funeral : दुर्गा भोसलेंच्या पार्थिवाचे उद्धव ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर - Thackeray took last darshan of Durga Bhosle
युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले यांच्यावर आज अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे. यांनी दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. दर्शन घेतांना रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते.
रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर :पेडररोडवरील धीरज अपार्टमेंट, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथे भोसले यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. दुर्गा भोसले यांचे निपचित पडलेले शव पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुन्न झाले. रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज संध्याकाळी पाच वाजता राहत्या घरातून दुर्गा भोसले यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्गा भोसलेयांच्या पश्चात पती, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
अखेरच्या फेसबुक लाईव्हने डोळे पाणावले :दुर्गा भोसले यांनी शेवटचं फेसबुक लाईव्ह करत शिंदे गटातील नेत्यांवर तिखट शब्दात टीका केली होती. रोशनी शिंदेला ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे, त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करावा. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांना मारहाण करण्याची पद्धत रूढ होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच ठाकरेंचं कुटुंब संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. मात्र, आम्ही शिवसैनिक सदैव ठाकरे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दुर्गा भोसले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला होता.