मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निहाय आढावा घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास माझा पाठींबा - मनोहर जोशी
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास त्याला माझा संपूर्ण पाठींबा असेल असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. या बैठकीला मनोहर जोशींसह, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, खासदार गजानन किर्तीकर, एकनाथ गायकवाड उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत औरंगबाद, मावळ, रायगड या मतदारसंघात शिवसेनेला पराभ पत्करावा लागला. या पराभावावरही बैठकीत चिंतन करण्यात आले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालासोबतच केंद्रीय आणि राज्य मंत्रीमंडळ विस्तारावर देखील चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.