मुंबई- ठाकरे घराण्यातून आदित्य हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, पण त्याच्यासाठी मी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले तो माझ्यापेक्षा जास्त काम करतो, मी आदित्यला शिवसेनेवर लादणार नाही.
आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण - मनसे
ठाकरे घराण्यातून आदित्य हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, पण त्याच्यासाठी मी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य मनापासून काम करतोय याचा मला आनंद आहे. लोकांची सेवा करण्याची ठाकरे कुटुंबाची परंपरा त्याने पुढे सुरू ठेवली आहे. दिवंगत बाळासाहेबांनी मला शिवसेनेवर लादला नाही तसा मी ही आदित्यला शिवसेनेवर लादणार नाही, असे उद्धव म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य राजकारणात उतरला आहे. त्याप्रमाणे तरुणांनी पुढे यावे आणि राजकारण हातात घ्यावे. माझी पिढी राजकारण बघत पुढे आली त्याप्रमाणे तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्र आणि देश घडवला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मला जे काही बोलायचे आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलेन असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.