महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray News: महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, मात्र स्वबळाचीही तयारी - आमशा पाडवी यांची माहिती - मुंबई काँग्रेसने आढावा बैठक घेतली

सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेसने आढावा बैठक घेतली. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटानेही मातोश्रीवर सर्व जिल्हाप्रमुख, आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव बाळासाहेब ठाकरे

By

Published : Aug 16, 2023, 6:53 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार आमशा पाडवी

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख आणि आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली असून, सध्या तरी महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती, आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे.


महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचे चित्र आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपण भाजपासोबत जाणार नाही आणि महाविकास आघाडीतच असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीने वातावरण अधिक गढूळ झाले आहे.



महाविकास आघाडी म्हणून लढा :आज झालेल्या आमदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना आपण आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत असे स्पष्ट केले. त्या दृष्टीने विचार करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतच असल्याचे स्पष्ट केले असल्याने, महाविकास आघाडी म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सर्व कार्यकर्त्यांनी करावी असे आवाहन, उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले.


तयारी करण्याचे आदेश : शिवसेना हा पक्ष अधिक वाढावा अधिक बळकट व्हावा यासाठी कार्यकर्ता स्तरावर संघटना बांधणी अधिक मजबुतीने करण्याचे आदेश, उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून तयारी करा, असे जरी सांगितले असले तरी गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारीही कार्यकर्त्यांनी ठेवावी. त्यादृष्टीनेही चाचपणी करावी अशीही यावेळी चर्चा झाल्याचे पाडवी यांनी स्पष्ट केले. या बैठकीला राज्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Jayant Patil Met Uddhav Thackeray : जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीमागचे सांगितले 'हे'
  2. Uddhav Thackeray Visit to Vidarbha : उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे नौटंकी आणि ढोंगी राजकारण- बावनकुळेकार
  3. Bawankule On Uddhav Thackeray : ...तर भाजप पेटून उठेल; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details